फॅसिझम हा संसदीय लोकशाहीचा शत्रू असतो!
फॅसिझम इतिहास, परंपरा, राष्ट्र, वैभव या सगळ्यांच्या घोषणा करीत असतो. असल्या प्रकारचे आधार फॅसिझमला लागतातच. कारण कोणते तरी भ्रम पक्केपणी मनात रुजवल्याशिवाय आत्महत्या करणारे पिसाट श्रद्धाळू मन जन्माला घालता येत नाही. शुद्धीवर असणारी माणसे गुलामगिरी संपवून स्वतंत्र होण्याचा प्रयत्न करणार. पूर्वी रणांगणावर सैन्याला दारू पाजली जात असे. नव्या जगात तशीच धुंदी आणणारे तत्त्वज्ञान पाजण्याचा प्रयत्न होतो.......